Surprise Me!

आणि त्याने महिलेसकट कार उचलली | Lokmat Marathi News | Mumbai Latest News

2021-09-13 0 Dailymotion

शनिवारी सगळी कडे एक विडीओ वायरल झाला, सगळी कडे ह्या व्हिडीओ वरच चर्चा रंगली होती. ज्यात एक महिला गाडीच्या मागच्या सीट वर बसून तिच्या तान्ह्या बाळाला स्तनपान करत बसली होती. आणि पोलीस त्या कार ला टोविंग करून घेवून जात होती. जेव्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा आरोपी कॉन्स्टेबल ला निलंबित करण्यात आले आहे. जो व्यक्ती हा व्हिडीओ बनवत आहे तो जेव्हा ह्या कॉन्स्टेबलला हि माहिती देतो तेव्हा तो कॉन्स्टेबल ह्या कडे दुर्लक्ष करून फोन वर बोलण्यात व्यस्त होतो. ह्यात कॉन्स्टेबल ची नेम प्लेट दिसत नाहीये. महिला ने सांगितले कि कॉन्स्टेबल ने नेम प्लेट काढून टाकली होती. हि घटना मालाडच्या एसव्ही रोड वर घडली. आता पर्यंत 13 लाखांच्यावर लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. आणि लोकं ह्या पोलिसाच्या नाकर्तेपणावर चर्चा करीत आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews